प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वरोरा तालुक्याच्या विकासाला चालना! आमदार करण देवतळे यांच्या हस्ते १७ फेब्रुवारीला विविध विकासकामांचे भूमिपूजन

वरोरा तालुक्याच्या विकासाला चालना! आमदार करण देवतळे यांच्या हस्ते १७ फेब्रुवारीला विविध विकासकामांचे भूमिपूजन

वरोरा : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वरोरा तालुक्यात मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त मा. आमदार करण देवतळे यांचा दौरा दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होत आहे. या दिवशी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पायाभूत सुविधा, रस्ते विकास तसेच इतर सार्वजनिक बांधकामांचे काम सुरू होणार असून यामुळे संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

हा विकास सोहळा म्हणजे तालुक्यातील नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आमदार देवतळे यांच्या हस्ते विविध गावांमध्ये नवीन प्रकल्पांचे उद्घाटन किंवा भूमिपूजन करण्यात येईल. यामध्ये मुख्यत्वे ग्रामीण रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक इमारती तसेच इतर मूलभूत सुविधांचा समावेश असल्याचे समजते.
स्थानिक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात आमदार देवतळे यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ होताच त्या-त्या गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.

आमदार करण देवतळे यांनी याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देखील देणार आहेत. या विकासकामांमुळे वरोरा तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सांगितले जात आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा विकास सोहळा साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------

खासदार धानोरकर यांच्या हस्ते बाबूलाल आईस्क्रीम प्रतिष्ठानचे उद्घाटन

         बाबूलाल आईस्क्रीम प्रतिष्ठानाचे नवीन सुरुवात.

Comments