खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

आमदार किशोर जोरगेवार यांची अँजिओप्लास्टी; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

आमदार  किशोर जोरगेवार यांची अँजिओप्लास्टी; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

चंद्रपूर, ता. ता. : भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे आमदार श्री. किशोर जोरगेवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. येथे डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, आमदार जोरगेवार यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आमदार जोरगेवार यांच्या प्रकृतीची मनापासून विचारपूस केली. खासदार धानोरकर म्हणाल्या, "आमदार किशोर जोरगेवार यांना उत्तम आरोग्य लाभो आणि ते लवकरात लवकर पुन्हा एकदा जनसेवेत सक्रिय होतील, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे." या भेटीमुळे जोरगेवार कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.




Comments