प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वरोरा येथे भव्य ग्रंथदिंडी व वाचक संमेलन उत्साहात साजरा.कविवर्य इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेचे वाचन.

वरोरा येथे भव्य ग्रंथदिंडी व वाचक संमेलन उत्साहात साजरा.

कविवर्य इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेचे वाचन.

वरोरा, (ता. २२ फेब्रुवारी) : लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वाचक संमेलन व ग्रंथ मेळाव्याची सुरुवात शनिवारी भव्य ग्रंथदिंडीने झाली. संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष विकास घुडे, डॉ. ब्रह्मदत्त पांडे, मंगेश मल्हार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून या दिंडीला प्रारंभ झाला.

लोकमान्य विद्यालयाच्या परिसरातून निघालेल्या या ग्रंथदिंडीत प्राथमिक ते पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. लेझीम नृत्य, थोर पुरुषांचे देखावे, वारकरी भजन मंडळ, संत परंपरा व पारंपारिक नृत्याच्या सादरीकरणाने वरोरा नगरी दुमदुमून गेली. विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी विद्यार्थ्यांना पाणी व खाऊचे वाटप करून पाहुणचार केला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थाचालक श्रीकांत पाटील यांना पुस्तक देऊन करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. बोकारे यांनी ग्रंथ दिंडीचे महत्त्व विशद करून वाचकांची संख्या कमी झाल्याची खंत व्यक्त केली. हा उपक्रम प्रथमच राबविल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. श्रीकांत पाटील यांनी लहानपणी वाचनाची सवय कशी लागली याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, "माझ्या वडिलांनी मला लहानपणी ज्ञानेश्वरी आणून दिली आणि सांगितले की, 'तुझ्या वडिलांनी आयुष्यात काय दिले तर सांग, त्यांना ज्ञानेश्वरी दिली.'" या पद्धतीचे संस्कार आपल्यावर झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कविवर्य इंद्रजीत भालेराव यांच्या भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. 'ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ माझे मायबाप...' या कवितेने कार्यक्रमाचा समारोप केला गेला.

प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री स्वागताध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विजय प्रकाशन, लाखे प्रकाशन आणि पिंपळापुरे प्रकाशनाचे प्रतिनिधी यावेळी मनोगत व्यक्त करणार आहेत.

महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त भीमाबाई जोंधळे (आजीचे पुस्तकांचे हॉटेल, नाशिक), अक्षर आनंद उपक्रमाचे विनोद शेंडगे (परभणी) आणि 'रीडिंग किडा' या बालवाचक घडविणाऱ्या उपक्रमाच्या प्रणेत्या डॉ. पल्लवी बापट (नागपूर) यांच्या मुलाखती होणार आहेत.

लोकमान्य विद्यालयाच्या परिसरात पुस्तक प्रकाशनाचे विविध स्टॉल लावण्यात आले होते. पुस्तकांवर सूट मिळत असल्याने वाचकांनी मोठ्या प्रमाणात पुस्तके खरेदी केली. या अनोख्या मेळाव्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

दुसऱ्या दिवशी रविवारी २२ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता 'वाचकाने लिहिते होताना' या सत्रात डॉ. माधुरी मानवटकर व प्रसिद्ध नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी आपला लेखन प्रवास कथन करतील. सकाळी १०.३० वाजता 'मैफल कवितांची' या कार्यक्रमात इंद्रजीत भालेराव आपल्या कवितांची मेजवानी सादर करतील.

कार्यक्रमास प्रा. काळभूत सर, प्राचार्य काळे सर, कलाशिक्षक प्रल्हाद ठक, कांबळे सर, डॉ. प्रशांत खुळे, लोणकर सर, पत्रकार व विद्यार्थी,वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
.................


Comments