खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*कॅम्पा’ प्रकल्पांतर्गत पारंपारिक बांबू कारागिरांचे सक्षमीकरण*

*कॅम्पा’ प्रकल्पांतर्गत पारंपारिक बांबू कारागिरांचे सक्षमीकरण*
 चंद्रपूर, दि. 22 :  कॅम्पा प्रकल्पांतर्गत मोहर्ली बांबू क्षेत्रातील पारंपारिक कारागीर समुदायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित 15 दिवसीय ‘बांबू बास्केट्री’ प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच यशस्वी समारोप झाला.
या प्रशिक्षणात स्थानिक महिलांनी बांबूपासून विविध आकर्षक व बाजारपेठेत मागणी असलेल्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. पारंपारिक टोपल्यांबरोबरच बांबू चटई, बांबू बुके, बांबूची फुले, बांबू बॅच आदी आधुनिक व कलात्मक वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड मिळाल्याने तयार झालेल्या वस्तू अधिक व्यावसायिक आणि दर्जेदार ठरल्या आहेत.
समारोपप्रसंगी आयोजकांनी सांगितले की, बांबू कारागिरांच्या हाताला काम मिळवून देणे आणि त्यांच्या कलेला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तू त्यांच्या आर्थिक प्रगतीस निश्चितच चालना देतील. कार्यक्रमादरम्यान महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले. गावाच्या सरपंच श्रीमती काटकर तसेच वन परिक्षेत्र अधिकारी श्री. थीपे यांनी महिलांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले.
सदर प्रशिक्षणाचे आयोजन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांनी केले. प्रशिक्षणाचे नियोजन पर्यवेक्षक योगिता साठवणे यांनी केले असून सहाय्यक म्हणून सुनिता मोकाशे, प्रशिक्षक बांबू सखी मनिषा नन्नावरे व अनिता भोयर तसेच विशेष प्रशिक्षक संतोष बजाईत यांनी मोलाची भूमिका बजावली. हा प्रशिक्षण कार्यक्रम बीआरटीसीचे संचालक मनोज खैरनार, वन परिक्षेत्र अधिकारी आकाश माल्लेलवार, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. 
*आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन* : कौशल्य विकासासोबतच कारागिरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षण कालावधीत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहभागी महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली तसेच त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.
०००००००

Comments