खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

वरोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; विविध कार्यक्रमांनी पाहुण्यांचे मनोरंजन

 वरोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; विविध कार्यक्रमांनी पाहुण्यांचे मनोरंजन

वरोरा (सरदार पटेल वॉर्ड) : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 18 व 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरदार पटेल वॉर्ड येथे आयोजित या कार्यक्रमात विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली गेली.

कार्यक्रमाची सुरुवात 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता झाली. यावेळी जिल्हा प्रमुख नितीन मत्ते व नगरसेवक बंडू भाऊ देऊळकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वयोगट 3 ते 7 व 8 ते 15 असे दोन गट ठेवण्यात आले होते. सोलो परफॉर्मन्समध्ये एकूण 17 स्पर्धकांनी सहभाग घेतला, तर ग्रुप डान्समध्ये 5 गटांनी आपली कला सादर केली.

दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांच्यासह संपूर्ण नगरपालिका अधिकारी व नगरसेवक यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सकाळी 10 वाजता महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यानंतर 10.30 वाजता शिवगर्जनेने परिसर दणाणून गेला. सकाळी 11 वाजता सरदार पटेल वॉर्डतर्फे पारंपरिक लेझिम सादर करून शिवतेजाचे दर्शन घडविण्यात आले. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी 7 वाजता सुगम संगीताच्या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमास खासदार प्रतिभाताई धानोरकर,माजी नगराध्यक्ष श्याम आली, छोटू भाऊ शेख, डॉ. विशाल येडे, डॉ. यशवंत निब्रेड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेवक दिनेश यादव, धनंजय लिगाडे, अनिल कुंकूले, अमोल महामुलकर, सुधाकर कुंकूले, गजानन कोतले, सचिन जरे, देवा वाटकर, रवी शिंदे, सोनू पित्तलवार, नितीन गायकवाड, भोला गायकवाड यांच्यासह समस्त छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीने परिश्रम घेतले.


श्रीराम ठेंगडी आणि डॉक्टर प्रफुल खुजे यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर.

Comments