प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वरोरात महिलांच्या रांगोळी स्पर्धेतून शिवजयंतीचा उत्सवशिवसेनेचे नेते मुकेश जीवतोडे यांचे भव्य आयोजन

वरोरात महिलांच्या रांगोळी स्पर्धेतून शिवजयंतीचा उत्सव

शिवसेनेचे नेते मुकेश जीवतोडे यांचे भव्य आयोजन 

वरोरा 
चेतन लूतडे 
 शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या शिवजयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली असून, परिसरात आकर्षक रंगरंगोटी व सजावट करण्यात आली होती.
शिवसेना पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यंदा गांधी उद्यान येथे मोठ्या प्रमाणावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उत्साहात सहभाग घेतला. महिलांनी आपल्या कल्पकतेतून विविध रंगीबेरंगी व आकर्षक रांगोळ्या साकारल्या.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे नेते मुकेश जीवतोडे यांनी केले होते. यावेळी बोलताना त्यांनी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जपणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी परीक्षक म्हणून प्रल्हाद ठक व कांबळे सर यांनी कामकाज पाहिले. यावेळी महिला आयोजन समितीच्या वतीने रीमा जीवतोडे यांच्यासह इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे शहरातील शिवजयंतीच्या उत्सवात रंगत आली असून, महिलांसाठी हा एक संस्मरणीय ठरला आहे.

....................................
                शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा




Comments