संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के

संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के वरोरा, दि. १६ एप्रिल: येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलने यंदाच्या शैक्षणिक सत्रातील परीक्षेत तालुकास्तरावर आपला दबदबा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली असून विद्यार्थिनी अदिती गायकवाड हिने तब्बल ९६.०० टक्के गुण प्राप्त करून वरोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी एकूण ९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी सर्वच्या सर्व ९० विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून शाळेचा निकाल १००% लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शाळेच्या वतीने अदिती गायकवाड हिचा विशेष सत्कार करण्यात येणार असून तिच्या यशामुळे संपूर्ण वरोरा परिसरात शाळेचे ...

*महापुरुष केवळ कार्यक्रमापुरतेच नसावे:आलोक जाधव* वरोडा :

*महापुरुष केवळ कार्यक्रमापुरतेच नसावे:आलोक जाधव*
 वरोडा : शाम ठेंगडी 

स्वधर्माच्या रक्षणार्थ शिवराय व शंभुराजे यासारख्या ज्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले. त्या महापुरुषांना डोक्यावर नाचविण्यापेक्षा त्यांना डोक्यात जपले पाहिजे. यामुळे स्वधर्माचे रक्षण होईल. स्वधर्म टिकला तरच आपले अस्तित्व राहील.महापुरूष केवळ कार्यक्रमापुरतेच नसावे तर त्यांचे स्मरण रोज करणे आवश्यक आहे. कारण त्यांच्यामुळेच आज आपण आहोत असे विचार वरोडा मराठा समाजाचे सचिव आलोक जाधव यांनी काढले.
      येथील स्वामीनाथा विद्यालयामध्ये 18 फरवरी रोज बुधवारला आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी सरबती बागला कॉन्व्हेंटच्या माजी मुख्याध्यापिका विद्या देव-ठेंगडी व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा चतुरकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
       यावेळी विद्या देव-ठेंगडी यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग सांगून आपण सर्वांनी धर्माच्या रक्षणार्थ त्यांच्यासारखे बनण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
      यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवबाचा पाळणा हे आकर्षक नृत्य सादर केले.
      मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांची  प्रतिमा व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सीमा करडक यांनी कार्यक्रमाचे संचालन व उपस्थित त्यांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Comments