प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

रेल्वे खांबाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्याभांदक येथे मध्य प्रदेशातील कामगाराचा मृत्यू

रेल्वे खांबाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

भांदक येथे मध्य प्रदेशातील कामगाराचा मृत्यू

भद्रावती : शहरातील भद्रावती रेल्वे स्थानकाजवळील गेट क्रमांक ३६ हद्दीत एका १८ वर्षीय तरुणाने विद्युत खांबाला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी  पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

दुर्गेश प्रसाद मसराम (वय 19) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील कोको बिच्छया या गावचा रहिवासी होता. तो आपल्या कुटुंबियांसह भांदक परिसरात रेल्वे लाईन व सायडिंगच्या कामासाठी हंगामी मजुरी करण्यासाठी आला होता. तो आपल्या आई-वडिलांसह रेल्वेजवळील झोपडपट्टीत वास्तव्यास होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे दुर्गेश घरात नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. यादरम्यान रेल्वे लाईनलगत असलेल्या विद्युत वाहिनी पोल क्रमांक ८५२ B, ३४ AI या खांबावर त्याने मानेला दुपट्टा गुंडाळून आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनास्थळी कुटुंबियांसह परिसरातील इतर मजुरांची गर्दी जमा झाली.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. मात्र, ही घटना मध्य रेल्वेच्या हद्दीतील असल्याने पुढील तपासासाठी रेल्वे सुरक्षा दल  ला पाचारण करण्यात आले. आरपीएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे हलविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक दृष्ट्या ही आत्महत्या असल्याचे दिसून येत असले तरी, अद्याप आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.

Comments