खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

बोर्डा गावात विकासकामांचा शुभारंभ; आमदार करण देवतळे यांच्या हस्ते सीसी रस्ता व नाल्याचे उद्घाटन

 बोर्डा गावात विकासकामांचा शुभारंभ; आमदार करण देवतळे यांच्या हस्ते सीसी रस्ता व नाल्याचे उद्घाटन

बोर्डा (वरोरा तालुका) : येथील मातोश्री वॉर्डात विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार करण देवतळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने दोन महत्त्वपूर्ण विकासकामांचे उद्घाटन केले.

आमदार देवतळे यांनी प्रथम श्री अशोक जयस्वाल यांच्या घरापासून ते श्री सुनिल भोयर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट (सीसी) रस्ता बांधकामाचे उद्घाटन केले. तसेच श्री अमोल देठे यांच्या घरापासून ते श्री धात्रक यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाच्या कामाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमुळे या भागातील नागरिकांची पायाभूत सुविधांसंदर्भातील मागणी पूर्ण झाली आहे.
या कार्यक्रमाला सरपंच राहुल ठेंगणे, डॉ. विजय देवतळे, सुनिल भोयर, कन्हैयालाल जयस्वाल, शंभूनाथ वरघाने, ओमजी मांडवकर, विजय मोकाशी, विठ्ठल लेडे, मोरे सर, वंदना दाते, अनिता देशेट्टीवर, अमृता सुर, किशन सुर, देविदास महाकाळकर, मधुसुधन टिपले, यशवंत सहारे यांच्यासह बोर्डा गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार करण देवतळे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा मजबूत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून विविध स्थानिक प्रश्न व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी नागरिकांनी आपल्या परिसरातील इतर समस्यांबाबतही आमदारांचे लक्ष वेधले. या चर्चेदरम्यान भविष्यातील विकासकामांबाबत आश्वस्त करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या विकासकामांमुळे मातोश्री वॉर्डातील नागरिकांची दळणवळणाची सोय सुलक्ष होणार असून पावसाळ्यात होणाऱ्या चिखल-पाण्याच्या समस्येपासून कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आमदार करण देवतळे यांचे आभार मानले.

Comments