खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

वरोरा उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा; खासदार धानोरकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

*"ग्रामस्थांवर सूडबुद्धीने केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन"*

 *खासदार प्रतिभा धानोरकर यांचा 'श्री सिमेंट' प्रशासनाला इशारा*

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील कोंढाळा-येन्सा येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या आणि 'श्री सिमेंट' कंपनीच्या मनमानी कारभारावर तोडगा काढण्यासाठी आज वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. "लोकशाहीत ग्रामसभेचा निर्णय सर्वोच्च असतो आणि प्रशासनाने त्याचा अवमान केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही," अशा कडक शब्दांत खासदार प्रतिभा  धानोरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

या बैठकीत कोंढाळा गावाचे नियमानुसार पूर्ण पुनर्वसन आणि स्थानिक सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने चर्चिला गेला. "कंपनीने बाहेरील कंत्राटी कामगारांऐवजी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणे अनिवार्य आहे," असा खंबीर पवित्रा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याच्या सूचना दिल्या. जमिनी देऊनही रोजगारासाठी भटकणाऱ्या तरुणांना न्याय मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या निष्पाप ग्रामस्थांवर कंपनी प्रशासनाने सूडबुद्धीने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून बाधित ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी संदीप मस्के, तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............

    राज्यस्तरीय अधिवेशनात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित श्याम ठेंगडी सर. 
.......

Comments