खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

वरोरा उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा; खासदार धानोरकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

वरोरा उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा; खासदार धानोरकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

गावकऱ्यावरील लावलेले गुन्हे वापस घेण्याची मागणी.

वरोरा : कोंढाळा-येन्सा येथील ग्रामस्थांच्या श्री सिमेंट कंपनीसंदर्भातील विविध मागण्यांबाबत आज उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांच्या समस्या आणि कंपनी प्रशासन याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार धानोरकर यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, ग्रामपंचायतीच्या नियमांना बगल देऊन कंपनीला देण्यात आलेली ५० वर्षांची एनओसी तातडीने रद्द करावी आणि ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर केला जावा. तसेच, कोंढाळा गावाचे नियमानुसार पूर्ण पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत स्थानिक सुशिक्षित तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावर विशेष चर्चा झाली. याशिवाय, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या ८ ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून ते त्वरित मागे घेण्यासाठी कंपनी प्रशासनावर दबाव निर्माण करण्याची आग्रही मागणी केली.

खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, "या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात यावी." या बैठकीतील निर्णयामुळे कोंढाळा-येन्सा परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून आपल्या मागण्यांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Comments