खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नवीन ‘कर्ज धोरण’ पुस्तिका प्रकाशित; ई-केवायसी सॉफ्टवेअरची सुरुवात जाहीर

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नवीन ‘कर्ज धोरण’ पुस्तिका प्रकाशित; ई-केवायसी सॉफ्टवेअरची सुरुवात जाहीर

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा देखरेख सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दादासाहेब देवतळे सभागृह, वरोरा येथे भव्य प्रशिक्षण शिबिर व नवनियुक्त संचालकांचा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र शिंदे उपस्थित होते.

चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी विशेष ‘कर्ज धोरण’ मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत शेतीपूरक व बिगर शेती व्यावसायिक कर्जांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने बँक लवकरच ‘ई-केवायसी’ (e-KYC) सॉफ्टवेअर सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे पिकांच्या नुकसानीची माहिती बँकेला त्वरित मिळेल व बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे सुलभ होईल.

या कार्यक्रमात आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांच्यासह माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, संचालक जयंत टेंभुर्डे, रोहित बोमावार, निशिकांत बोरकर, दिनेश चोखारे, डॉ. ललित मोटघरे, गणेश तरवेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती वरोरा विजय देवतळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भद्रावती राजू टोंगे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कल्याणकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक जयंत टेंभुर्डे यांनी उत्कृष्ट नियोजनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले. या यशस्वी आयोजनाबद्दल वरोरा तालुका सेवा सहकारी संस्था समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Comments