कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

सिने स्टाईल मगराला पकडण्यात अपास हिरोंचे यशआल्फर गावातील नाल्यातून सापडलेला मोठा मगर धरणात सोडला, अपास संस्थेच्या मदतीने रेस्क्यू यशस्वी

सिने स्टाईल मगराला पकडण्यात अपास हिरोंचे यश

आल्फर गावातील नाल्यातून सापडलेला मोठा मगर धरणात सोडला, अपास संस्थेच्या मदतीने रेस्क्यू यशस्वी

वरोरा/चेतन लूतडे १/२/२०२६

वरोरा: आल्फर गावातील एका शेताजवळच्या नाल्यातून मोठा मगर (मगर) पकडण्यात आला आहे. यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनानंतर त्याला चारगाव धरणात सुरक्षित सोडण्यात आले.

घटनेचा क्रम असा होता की, नितेश तुरानकर यांच्या शेतातील नाल्यात पाणी भरल्यानंतर तेथे मोठा मगर दिसला. तो त्यांच्यावर चाल करून आल्याने भीती निर्माण झाली. ही बातमी गावात पटकन पसरली आणि तत्काळ वनपरिषद, वनविभाग वरोरा यांना कळवण्यात आले. त्यानंतर वनविभागाने 'अपास' एनजीओची रेस्क्यू टीम बोलावली.

दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये पाण्यातील मगराला सापळा लावून पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला खूप कसरत करावी लागली. हे प्रयत्न पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. सिने चित्रपटात दाखवलेल्या दृशानुसार अपास एनजीओच्या हिरोनी या मगराला पकडतानाताचे दृश्य अनेक गावकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे. हा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी उपस्थित होते.

अपास एनजीओच्या टीमने वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह केलेले संयुक्त प्रयत्न यशस्वी:

रेस्क्यू कार्यामध्ये अपास एनजीओचे विशाल मोरे, हर्षल बाकडे, विवेक मोरे, पंकज खाजणे, प्रशांत राऊत, अमित नन्नावरे, राहुल पानघटे, शुभम भगत, श्रीपाद बाकडे, आशिष चहा काटे यांनी तसेच वनपरिषद कार्यालयातील आरएफओ सतीश शेंडे, शेगाव आरक्षी जितेंद्र लोणकर, टेंभुर्डा आरक्षी दिवाकर चांभारे आणि आल्फरचे वनरक्षक हजारे यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता.

यानंतर मगराला योग्य प्रक्रियेने चारगाव धरणात सोडण्यात आले. हा मगर साधारण ९ फूट लांब होता असे सांगितले जाते.
आतापर्यंत नऊ मगरांचे यशस्वी स्थानांतरण:

हा घटनास्थळावर अपास एनजीओने आतापर्यंत पकडलेला नववा मगर आहे. गेल्या काही वर्षांत, मानव-मगर संघर्ष वाढल्यामुळे, संस्थेने वनविभागासोबत मिळून असे अनेक यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले आहेत. गावकऱ्यांनीही या प्रसंगी सज्जता दाखवून वनविभागाला तातडीने माहिती दिल्याचे कौतुकास्पद आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सूचित केले आहे की, अशा जंगली प्राण्यांचा सामना करण्याऐवजी लगेच वनविभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी, याच बरोबर तलाव/नाल्यांजवळ पाणी भरल्यानंतर सावधगिरी बाळगावी.




Comments