खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*तरुण भारतचे श्याम ठेंगडी यांना राज्यस्तरीय जीवनगौरव तर डॉ.प्रफुल्ल खुजे यांना देवदूत पुरस्कार**वरोड्यात 21 फरवरीला लघु व मध्यम वृत्तपत्र असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन*

*तरुण भारतचे श्याम ठेंगडी यांना राज्यस्तरीय जीवनगौरव तर डॉ.प्रफुल्ल खुजे यांना देवदूत पुरस्कार*

*वरोड्यात 21 फरवरीला लघु व मध्यम वृत्तपत्र असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन*

वरोरा 
लघु व मध्यम वृत्तपत्र असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन वरोडा येथे होत आहे.या अधिवेशनात दैनिक तरुण भारतचे वरोडा तालुका प्रतिनिधी श्याम ठेंगडी यांना राज्यस्तरीय जीवन पुरस्कार तर वरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रफुल्ल खुजे यांना देवदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
     असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार  व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर आणि राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे हे उपस्थित राहतील. 
     या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर ,वर्धा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर तसेच शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे व वरोडाच्या नगराध्यक्षा अर्चना ठाकरे  यांचीही उपस्थिती राहणार आहे.

हे अधिवेशन येथील नगर भवनात सकाळी 11 वाजता सुरू होऊन दिवसभर चालणार आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पत्रकार, संपादक, प्रकाशक, मुद्रक, वार्ताहर तसेच डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या अधिवेशनात लघु व मध्यम वृत्तपत्रांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी, जाहिरात धोरणातील बदल, शासकीय मान्यतेच्या प्रक्रिया, डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेत झालेले परिवर्तन, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, तसेच नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि संधी या विषयांवर सखोल मार्गदर्शन व मुक्त चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.
सहभागी पत्रकार, संपादक आणि माध्यम प्रतिनिधींना या अधिवेशनात आपले अनुभव, मते आणि सूचना मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

या राज्यस्तरीय अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वाडकर, राष्ट्रीय सचिव ईश्वरशिंग, राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेश तुरेराव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष धरमकर, राज्य सचिव आशिष घुमे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जीवन बागडे, आणि अभीषेक भागडे यांनी संयुक्तपणे केले आहे.

*विविध पुरस्कारांची घोषणा*

अधिवेशनात विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, राज्यभरातील पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्याचा हेतू यामागे आहे.
राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार – व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या प्रदेशाध्यक्ष अश्विनी पुरी यांना प्रदान केला जाईल.जीवनगौरव पुरस्कार डॉ. विश्वास आरोटे, संपादक दैनिक समर्थ गावकरी, राज्य सरचिटणीस (महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ), अकोले,पंढरीनाथ बोकारे, जेष्ठ पत्रकार, नांदेड,राजू पाटील, संपादक दैनिक मनोगत आणि द रिंगण लाईव्ह, औसा (लातूर) ,किशोर पाटील, संपादक दैनिक स्वराज्य तोरण, भिवंडी,रमाकांत साळुंके, संपादक साप्ताहिक सिद्धेश्वर संदेश, सोलापूर,ज्ञानेश्वर धुळे, संपादक साप्ताहिक कारंजा सामना, कारंजा,डॉ. मेहबूब मालाबोडी, संपादक डिपार्टमेंट एक्सप्रेस, कर्नाटक,नारू, ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार, हैद्राबाद (तेलंगणा),विलासकुमार गणपती सिंधे, संपादक दैनिक हेज्जे गुरुटू, कर्नाटक, डॉ. सुरेश चिंचोळकर, संपादक साप्ताहिक बिरसा वार्ता, यवतमाळ, आनंद शुक्ला, संपादक साप्ताहिक जागरण, वर्धा, श्याम ठेंगडी, जेष्ठ पत्रकार, दैनिक तरुण भारत, वरोडा
याशिवाय देवदूत पुरस्कार वरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रफुल खुजे यांना जाहीर करण्यात आला आहे.
-------**--*

.                 भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन

Comments