वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप*

*जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप*

चंद्रपूर, दि. 13 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26 चे आयोजन 7 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात आले. जिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय बालगृहातील मुलांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा तसेच इतर मुलांसोबत स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी चाचा नेहरू बालमहोत्सव घेण्यात आला. बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला.

पोलिस फुटबॉल मैदान येथे रंगलेल्या तीन दिवसीय कबड्डी, खो-खो, गोळा फेक, धावणे, रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, नृत्य, गायन आदी जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण मुख्य न्याय दंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदीप काठोळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या भावना देशमुख, ज्योत्स्ना मोहितकर, अॅड. मनिषा नखाते, वनिता घुमे, संरक्षण अधिकारी कविता राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धातूनच यशस्वी व्यक्तिमत्व घडत असते. म्हणून स्पर्धेला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा. यातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळेल, असे प्रतिपादन मुख्य न्याय दंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी यांनी केले. स्पर्धामध्ये विजेते स्पर्धक नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील चाचा नेहरू बाल महोत्सव 2025-26 स्पर्धेकरीता पात्र ठरले आहेत.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा समन्वयक अभिषेक मोहुर्ले यांनी तर आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी मानले. शनिवारी 10 जानेवारी ला बालकांची शैक्षणिक सहल बॉटनिकल गार्डन विसापूर बल्लारपूर येथे नेण्यात आली. बालमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मिनाक्षी भस्मे, जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे, विधी सल्लागार अनिल तानले, अधिक्षक हेमंत सवई, दिवाकर महाकाळकर, अतिशकुमार चव्हाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, शामराव मोदिलवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन चंद्रपूर, रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन बल्लारपूर, सखी वन स्टॉप सेंटर, स्त्री आधार केंद्र, किलबिल दत्तक संस्था, जिजामाता वर्कींग वूमन होस्टेल, जिल्हा सक्षमीकरण केंद्र, स्वामी विवेकानंद बालगृह राजुरा, स्वामी विवेकानंद बालगृह नागभीड आदींनी महत्वाची भूमिका पार पाडली.

००००००


Comments