कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

*नायलॉन मांजा विक्री व वापरणा-यांविरोधात सक्त कारवाई करा* *जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश*

*नायलॉन मांजा विक्री व वापरणा-यांविरोधात सक्त कारवाई करा*
 *जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश*

चंद्रपूर, दि. 06 : दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक लोक जखमी होतात किंवा काही जणांचा मृत्यु होतो. याला सर्वस्वी जबाबदार नायलॉन मांजा विक्री करणारे आणि ते वापरणारे आहेत. त्यामुळे अशा लोकांविरुध्द सक्त कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, मनपा उपायुक्त श्री. चिद्रावार, दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून त्याच्या सर्रास वापरामुळे दरवर्षी अनेक नागरिक गंभीर जखमी होतात तर काहींना जीवही गमवावा लागतो. यासाठी नायलॉन मांजा वापरणारे तसेच त्याची विक्री करणारे विक्रेते जबाबदार आहे. नायलॉन मांजाचा वापर अतिशय धोकादायक आहे. अशा विक्रेत्यांविरोधात सक्त कारवाई करावी. त्यासाठी संयुक्त पथके तयार करावी. बाजारात किंवा विक्री होत असलेल्या भागात नियमित गस्त घालावी. प्रत्येक तालुक्यात जास्तीत जास्त कारवाई करणे अपेक्षित आहे. केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, अशा सुचना त्यांनी दिल्या.
००००००

Comments