जयपूर (राजस्थान) येथे दिनांक १९ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत फ्रीस्टाईल फूमसे या प्रकारामध्ये सहा कांस्यपदकांची कमाई केली. या ऐतिहासिक यशामुळे महाविद्यालयाचा तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढला आहे.
सदर स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंनी फ्रीस्टाईल फूमसे प्रकारात कांस्यपदके पटकावत आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणाऱ्या भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी आपली निवड निश्चित केली आहे. विशेष म्हणजे फ्रीस्टाईल फूमसे प्रकारात पदक व निवड मिळवणारे हे विदर्भातील पहिलेच खेळाडू ठरले आहेत. या यशामुळे आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
कांस्यपदक विजेते खेळाडू –
हृतिक मेश्राम, कृष्णा दैवलकर, काशिश कुमरे, तनुजा पाईघन, आचल आत्राम आणि समीक्षा सावसाकडे महाविद्यालयात पदवीला शिक्षण घेत आहे.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नियमित प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक माजी सैनिक बजरंग वानखेडे तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. तानाजी बायस्कर, श्री. सचिन साळुंखे व विजयी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, विश्वस्त श्री. कौस्तुभ आमटे, सौ. पल्लवी आमटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा. राधा सवाने, डॉ. विजय पोळ, श्री. सुधाकर कडू तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment