वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन*

*हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन*

चंद्रपूर,दि. 09 : हरभरा पिकाचे बारकाईने निरीक्षण करून घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच व्यवस्थापनाचे उपाय योजावे. या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंडयावर, कळयावर व फुलांवर एकरी अंडी घालते. ही अंडी खसखसीत दाण्यासारखी दिसतात त्यामुळे 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होवून वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळया संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांदयाच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळया प्रामुख्याने फुले व घाटयांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळया घाटयाला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधरणतः 30-40 घाटयांचे नुकसान करते.

*एकात्मिक व्यवस्थापन :* 1. घाटे अळीचे परभक्षक उदा, बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी ईत्यादी पिकामध्ये फिरून घाटे अळया वेचुन त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. 2. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये लावावे. त्यामुळे पक्षांचे अळया वेचण्याचे काम सोपे होते. 3. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटेअळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्यूर) एकरी किंवा दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस 8 ते 10 पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. 4. शेतकरी बंधुनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी खालील दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्या .

*पहिली फवारणी (50 टक्के फुलोऱ्यावर असतांना) :* निंबोळी अर्क  5 टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि. (1x10 पिओबी/मिली) 500 एल ई./हे किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी., 20 मि.ली.

*दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीच्या 15 दिवसानंतर) :* 1. इमामेक्टीन बेझाएट 5 टक्के एस जी 3 ग्रॅम किंवा 2. ईथिऑन 50 टक्के ई.सी. 25मिली किंवा 3. क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस. सी . 2.5 मिली

 सदर किडीचे वेळीच व्यवस्थापन केल्यास प्रादुर्भाव नियंत्रण करता येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

००००००

Comments