महात्मा गांधी शहादत दिनी माढेळी येथे भव्य मानसिक आरोग्य शिबीर संपन्न; ५१ जणांची तपासणी

महात्मा गांधी शहादत दिनी माढेळी येथे भव्य मानसिक आरोग्य शिबीर संपन्न; ५१ जणांची तपासणी

माढेळी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शहादत दिनाच्या निमित्ताने माढेळी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेले मानसिक आरोग्य शिबीर अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाले. ‘निरंतर आधार’ बहुउद्देशीय संस्था, चिनोरा व जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात मानसिक आरोग्य विषयी जागरुकता निर्माण करणे तसेच या विषयावरील अंधश्रद्धा व भीती दूर करणे होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गांधीजींच्या प्रतिमेस सुती माळा वंदन करण्यात आले तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी हालहंगामंत निधन पावलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थितांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय युवा संघटनेचे महेश सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाध्यक्ष म्हणून सरपंच देवानंद महाजन यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून राजू सवई, जुलमे सर (शिक्षक), प्राथमिक आरोग्य केंद्र माढेळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक उपाध्ये तसेच चंद्रपूर येथील मानसरोग तज्ज्ञ डॉ. संदीप भटकर यांनी सहभाग दिला.

या एकदिवसीय शिबिरात एकूण ५१ नागरिकांना मानसिक आरोग्य तपासणी, समुपदेशन व मार्गदर्शनाची सेवा पुरवण्यात आली. या शिबिरास एकूण १४९ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. आयोजकांनी गेल्या एका महिन्यात ४९ गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविल्याची माहिती दिली.

डॉ. दुर्गाप्रसाद वनकर, मानसशास्त्रज्ञ डॉ. शुक्ला व मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते अतुल शेंद्रे यांनी मानसिक आरोग्यावर भाषणे देत मानसिक आजार कमजोरी नसून उपचारांनी बरा होऊ शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणारा संदेश दिला. उषा गजभिया यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक जुलमे सर यांनी केले तर सूत्रसंचालन शारदा टिपले यांनी केले. आभारप्रदर्शन ‘निरंतर आधार’ संस्थेच्या वतीने करण्यात आले. आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन (वरोरा) येथील एनसीसी व एनएसएस विद्यार्थी, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शिबीर यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

Comments