*आमदार करण देवतळे यांची स्पष्टोक्ती*
वरोडा :३०/१/२६
विविध शासकीय योजनांमधून तसेच आमदार निधीतून पिपरबोडी,चिनोरा येथे विविध विकास कामे येणाऱ्या पुढील चार वर्षात करणार असल्याचे प्रतिपादन आमदार करण देवतळे यांनी 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिपरबोडी,चिनोरा येथे केले.
. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पिपरबोडी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल दडमल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चिनोऱ्याच्या सरपंच ताई परचाके ,उपसरपंच वंदना ढेंगळे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू भोयर, पत्रकार धर्मेंद्र शेरकुरे हे उपस्थित होते.
नवनियुक्त बीएसएफ जवान स्वप्निल पवार यांचा जाहीर सत्कार आमदार करण देवतळे व आदिवासी हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरबोडी येथे 26 जानेवारी 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पिपरबोडी,चीनोरा व हुडकी खदान येथील तीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी सहभागी झाल्या होत्या.
. यावेळी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे एकल नृत्य,सामूहिक नृत्य, नाटक व देशभक्तीपर गाण्यांचे सादरीकरण केले. जिल्हा परिषद शाळा चिनोरा शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाकर नन्नावरे यांच्या हस्ते,हुडकी खदान शाळेला शाळेचे माजी अध्यक्ष रवींद्र शेरकुरे यांच्या हस्ते तर पिपरबोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या विद्यार्थ्यांना अतुल दडमल यांच्या हस्ते बक्षीस पर सन्मानचिन्ह व शालेय उपयोगी वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
सचिन घोसरे यांचेकडून अंगणवाडी केंद्राला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य निलेश डोंगरकार,छाया कोल्हेकर ,माजी सदस्य अविनाश ढेंगळे, माजी सरपंच सुशीला तेलमोरे, शाळेचे मुख्याध्यापक साठे, सुनील बुरीले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका शुभांगी सोयाम यांनी कार्यक्रमाचे संचलन तर शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या दयासागर मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते त्रिशूल निबुदे ,सचिन घोसरे,प्रवीण ज्ञानेश्वर नंनावरे ,जितेंद्र नंनावरे ,प्रमोद घोसरे ,राजेश्वर नंनावरे ,नेपाल शेरकुरे,यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment