युवा प्रतिष्ठान कोरपना आणि विजयराव बावणे मित्र परिवार यांच्यामार्फत “माय-माऊली हळदी-कुंकू” सोहळ्याचा उत्साहवर्धक आनंद साजरा.

युवा प्रतिष्ठान कोरपना आणि विजयराव बावणे मित्र परिवार यांच्यामार्फत “माय-माऊली हळदी-कुंकू” सोहळ्याचा चैतन्यमय आनंद साजरा.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हा केवळ शब्दांचा विषय नसून तो कृतीचा भाग असावा. अध्यक्ष रवींद्र शिंदे 

कोरपना : ‘युवा प्रतिष्ठान कोरपना’ आणि ‘विजयराव बावणे मित्र परिवार’ यांच्या वतीने आयोजित “माय-माऊली हळदी-कुंकू” समारंभात सहभागी झालेल्या सर्व माता-भगिनींच्या उत्साहातून परिसरात चैतन्यमय ऊर्जा पसरली होती. भारतीय संस्कृतीतील हा मंगलमय उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

या सोहळ्यास माजी आमदार सुदर्शन निमकर, ठाणेदार लताताई वाढीवे, माजी सभापती श्यामबाबू रणदिवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव बावणे, नगरपंचायत नगराध्यक्ष नंदाताई बावणे, विजयराव बावणे, सुरेश पाटील मालेकर, नगरसेविका संध्याताई चांदेकर, जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेणेकर, ज्येष्ठ नेते रसूल पटेल, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक पाटील गिरसावळे, ज्येष्ठ समाजसेविका सुनिताताई गिरसावळे, नगरसेविका राधिका मडावी, देविका पंधरे, सभापती अरिफाताई शेख आणि नगरसेविका ज्योत्स्नाताई खोबरकर उपस्थित होते.

यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे बोलताना त्यांनी महिला आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला. त्यांनी सांगितले की, “महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हा केवळ शब्दांचा विषय नसून तो कृतीचा भाग असावा. बँकेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही भगिनीला आर्थिक प्रगतीसाठी भांडवल किंवा इतर तांत्रिक अडचणी येणार नाहीत.” त्यांनी महिलांसाठी चालविल्या जाणाऱ्या बँकेच्या विविध विशेष योजना व उपक्रमांची माहिती देत त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमातील सर्व माता-भगिनींच्या सहभागातून सांस्कृतिक एकात्मतेचा व सामाजिक सौहार्दाचा संदेश प्रकर्षाने जाणवला.

Comments