माढेळी : जैन समाजाच्या आराध्य दैवत श्री शंखेश्वर पार्श्वनाथ या मंदिराला २५ वर्षे पूर्ण झाल्याने पाच दिवसीय रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा कार्यक्रम २६ जानेवारीपासून माढेळी येथील जैन मंदिरात सुरू होत आहे.
श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंदिराचे अध्यक्ष सुभाषचंद मुथा यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा होणार आहे.
माढेळी येथे दीडशे वर्षांपूर्वी जैन समाजाचे आगमन झाले. २५ वर्षांपूर्वी राजस्थानमधील कारागिरांनी हे मंदिर उभारले. या निमित्ताने रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अंतर्गत २६ जानेवारीला पार्श्वनाथ महापूजन, २७ जानेवारीला कुंभ स्थापना व पाटला पूजन, २८ जानेवारीला श्री लघुशांती स्थान महापूजन व जैन स्थानक गुणानुवाद, २९ जानेवारीला रथयात्रा, गावात दिंडी प्रदक्षिणा व नगरभोजन तर ३० जानेवारीला सत्तरभेदी पूजा व रजत ध्वजाचा मंगल विधी होणार आहे.
या कार्यक्रमात मंदिराचे पूजक उद्योजक प्रकाशचंद मुथा, नरेशचंद मुथा, सुनील मुथा, अनिल मुथा, संजय मुथा, संदीप मुथा, अमोल मुथा, चंदन मुथा, प्रतीक मुथा, जितू मुथा, मनीष बोगावत यासह सर्व जैन बांधव सहभागी होणार आहेत.
Comments
Post a Comment