शालेय साहित्य वाटप उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते :-नगराध्यक्षा सौ.अर्चनाताई ठाकरे.समितीचे कार्य प्रशंसनीय :-उपाध्यक्षा सौ.योगिता नेरकर.
समितीचे कार्य प्रशंसनीय :-उपाध्यक्षा सौ.योगिता नेरकर.
वरोरा :- श्री जगन्नाथ बाबा यांच्या कृपेने आणि भक्ती भावाने दर महिन्याच्या 16 तारखेला वरोरा शहरातील रेल्वे स्टेशन चौक येथे सकाळी 8:00वाजता श्री जगन्नाथ बाबा सेवा समिती रेल्वे स्टेशन चौक वरोरा द्वारे पूजा अर्चना व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. सोबतच वर्धा -हिंगणघाट- चिकणी -डोंगरगाव येथून पॅसेंजर ट्रेन द्वारे येणारे भक्तगन तसेच वरोरा शहरवासी यांचे करिता वरोरा ते भांदेवाडा बस सुरू करण्यात आलेली आहे. रेल्वे स्टेशन चौक वरोरा ते भांदेवाडा देवस्थान पर्यंत बस सुरू केल्यामुळे भक्तांचा प्रवास सुकर झाल्यामुळे सर्व भक्तगण हर्षलित व आनंदित झालेले आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पूर्णतः भक्त वर्गाच्या देणगीतून राबविण्यात येत असून कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक उद्देश नसून केवळ सेवा व श्रद्धा हेतू आहे. नगराध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भांदेवाडा जाणाऱ्या भावी भक्तांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन सुरू केलेल्या बसची आणि अन्नदानाची श्री जग्गनाथ बाबा सेवा समिती च्या कार्याची भरभरून प्रशंसा केली.
सदर कार्यक्रमात वरोरा शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.अर्चनाताई ठाकरे,उपाध्यक्षा सौ.योगिताताई नेरकर,सर्वश्री नगरसेवक मनिष जेठांनी,अक्षय भिवदरे, राहुल देवडे, अनिल झोटिंग,सौ. नलिनी आत्राम तसेच सिनेसृष्टी निर्माता अनिल वरखडे,मनोहर स्वामी,प्रवीण धनवलकर इत्यादी मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात अतिथी मान्यवर तसेच भावी भक्त आणि स्थानीय जनसमुदाय सोबतच श्री जगन्नाथ बाबा सेवा समिती द्वारे श्री जगन्नाथ बाबा ची पूजा अर्चना करून करण्यात आली. यानंतर लगेच मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद व फळ वाटप करण्यात आले.तदनंतर मान्यवरांचे सत्कार करून मालवीय शाळेतील पहिले ते सातवी वर्गापर्यंतच्या 41 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे संचालन शाम ठेंगडी सर( पत्रकार )यांनी केले तर प्रास्ताविक हरीश केशवानी (पत्रकार )आणि आभार प्रदर्शन राजेश रनशूर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरीश केशवानी, विजय पानघाटे, सुरज केशवानी, ओम यादव,शेख जब्बार, अमित घोडमारे,अशोक पराते,राजेश रणशुर,प्रकाश पोहाने,प्रवीण सुराणा,किशोर उत्तरवार, लखन केशवाणी आणि अनेक कार्यकर्ते तसेच भक्तजन इत्यादींनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमात भक्तजन तसेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
Comments
Post a Comment