दिनांक ९ जानेवारी, २०१९ रोजी पोलीस स्टेशन पडोली हद्दीतील मौजा साखरवाही येथील फिर्यादी नामे आशुतोष दिलीप शेरकी वय २१ वर्ष याने तक्रार दिली की, त्याच्या घराशेजारी इसम नामे वैभव पुंडलिक शेरकी वय ३५ वर्ष याने मृतक नामे दिलीप बाबुराव शेरकी वय ५१ वर्ष यास शिवीगाळ केल्याचे कारणावरुन झगडा-भांडण करुन बांबुचे काठीने डोक्यावर, हातावर, छातीवर जबर मारहाण गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार केले यावरुन पोस्टे पडोली येथे अप.क्र.९/२०१९ कलम ३०२, ३२४ भादंविचा गुन्हा नोंदविण्यात येवुन गुन्हयाचा सखोल तपास पोस्टे पडोली येथील तत्कालीन पोउपनि श्री नागेश जायले यांनी करुन तपासाअंती भक्कम पुराव्याचे आधारे आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले असता कोर्ट विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधिश चंद्रपूर श्रीमती एस.एस. भिष्म मॅडम यांनी आज दि.२९/१२/२०२५ रोजी आरोपीस कलम ३०२ भादंवि मध्ये आजन्म सश्रम कारावास (जन्मठेप) व १०,०००/- रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री प्रशांत घट्टुवार, जिल्हा सरकारी वकील चंद्रपूर, आणि पैरवी अधिकारी म्हणुन मपोअं/२६७० रोशनी रंगारी आणि दत्तक अधिकारी म्हणुन सपोनि श्री योगेश हिवसे यांनी कामगिरी बजावली आहे.
Comments
Post a Comment