भाजपचा जोरदार निवडणूक प्रचार: घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीसाठी नागरिकांना विजयाचे आवाहन.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शारदा (पूजा) मोहन दुर्गम यांच्या सभेसाठी दिग्गज मैदानात.

भाजपचा जोरदार निवडणूक प्रचार: घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीसाठी नागरिकांना विजयाचे आवाहन.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शारदा (पूजा) मोहन दुर्गम यांच्या सभेसाठी दिग्गज मैदानात.

घुग्घुस: घुग्घुस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत भारतीय जनता पक्षाचा (भाजप) निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे. इतर मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहिर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, राजुऱ्याचे आमदार देवराव भोंगळे तसेच चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार प्रभावीपणे राबविण्यात आला.
आज शहरातील विविध प्रभागांना भेट देऊन पक्षप्रतिनिधींनी नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या भाजप उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

प्रचारादरम्यान केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपने राबवलेल्या लोककल्याणकारी धोरणांची, विकासाभिमुख निर्णयांची व पारदर्शक प्रशासन पद्धतीची माहिती नागरिकांना दिली गेली. भाजप नेतृत्वाखाली देश, राज्य आणि जिल्हा स्तरावर होत असलेला सर्वांगीण विकास आणि सकारात्मक बदलही अधोरेखित करण्यात आला.

कार्यकर्त्यांनी घुग्घुस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, प्रामाणिक व विकासनिष्ठ नेतृत्व आवश्यक असून ते नेतृत्व भाजपच देऊ शकते, अशी खात्री व्यक्त केली. नागरिकांनी मोठ्या संख्येने भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमात नामदेवजी डाहुले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शारदा (पूजा) मोहन दुर्गम, विविध प्रभागांतील नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------

Comments