महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण व एक रजतपदक जिंकले, राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता

महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण व एक रजतपदक जिंकले, राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता

बातमी: वरोरा 
चेतन लूतडे 

आनंदवन - तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारे नाशिक येथे ७ ते ११ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगीरी करून सहा सुवर्ण व एक रजतपदक मिळवले. या स्पर्धेत महाविद्यालयाचे सहा खेळाडू पूमसे फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक विजेते ठरले तर एका खेळाडूने किरोगी प्रकारात रजतपदक पटकावले.

स्पर्धेच्या तपशिलांनुसार, पूमसे फ्रीस्टाईल प्रकारात कु. कशिश बापूराव कुमरे, कु. तनूजा देवेन्द्र पायघन, कु. आचल तूकडोजी आत्राम, कु. समीक्षा बंडुजी सावसाकडे, श्री. रुतिक भोलाराव मेश्राम आणि श्री. कृष्णा बंडूजी दैवलकर यांनी सुवर्णपदके मिळवली. तसेच कु. समीक्षा बंडुजी सावसाकडे यांनी किरोगी प्रकारात रजतपदक जिंकले. या यशामुळे सर्व खेळाडूंनी जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो फेडरेशन कप साठी देखील पात्रता मिळवली आहे.

आनंद निकेतन महाविद्यालयातील हे खेळाडू एनआयएस प्रशिक्षक व अंतरराष्ट्रीय खेळाडू, माजी सैनिक श्री. बजरंग वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. त्यांच्या प्रशिक्षणाचे व स्पर्धात्मक भावनेचे हे यश फलित आहे.

या उल्लेखनीय यशानिमित्त महारोगी सेवा समिती, वरोरा यांचे सचिव डॉ. विकासभाऊ आमटे, विश्वस्त श्री. कौस्तुभ आमटे, सौ. पल्लवी आमटे, श्री. सुधाकर कडू, डॉ. विजय पोळ, श्री. सदाशिव तांजणे, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा. राधा सवाने, श्री. राजेश ताजणे, शारीरिक शिक्षण संचालक व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर, प्रा. सचिन साळुंखे, श्री. तुषार पारखी तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व जानेवारीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालय प्रशासनाने खेळाडूंच्या साधनासामग्री व प्रशिक्षणासाठी पूर्ण पाठबळ दिल्याचे सांगितले. आनंद निकेतन महाविद्यालयाने शैक्षणिक बरोबरच क्रीडा क्षेत्रातील अशा यशासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. खेळाडूंच्या भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Comments