वरोरा नगराध्यक्षपदी अर्चना ठाकरे यांचा पदभार, शिवसेना ,राष्ट्रवादी पक्षाचे समर्थन.



वरोरा नगराध्यक्षपदी अर्चना ठाकरे यांचा पदभार, शिवसेना ,राष्ट्रवादी पक्षाचे समर्थन.

वरोरा : वरोरा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. श्री शिवाजी महाराज सभागृहात या निमित्ताने आयोजित पदग्रहण व सत्कार सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवक-सेविकांचाही गौरव करण्यात आला.

आपल्या पहिल्याच भाषणात नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांनी शहराच्या विकासासाठी कटिबद्धता व्यक्त करत म्हटले, "नागरिकांच्या विश्वासाचे ऋण फेडण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. शहर स्वच्छ, सुंदर व विकासाभिमुख करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे."

मुख्य पाहुण्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, "शहराचा पूर्ण विकास अद्याप झालेला नाही. सत्ताधारी-विरोधी असा भेद न करता सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवले जातील. ठोस विकास आराखडा तयार केला जाईल."यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरसेवक व पदाधिकारी यांनी जाहीर समर्थन दिल्याने सत्ता स्थापित करण्यात आली आहे. 

कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, विलास टिपले, अहेतेशाम अली, विलास नेरकर, बाबा भागडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

या सोहळ्यात नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक पक्षपदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Comments