वरोरा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ७ मध्ये राहुल जानवे बाजी मारणार ?एकूण ३४३९ मतदार, ६ उमेदवारांची होणार चाचपणी
एकूण ३४३९ मतदार, ६ उमेदवारांची होणार चाचपणी
वरोरा: वरोरा नगरपालिकेच्या प्रभाग सात वार्डातील निवडणुकीत सहा उमेदवारांची स्पर्धा आहे. या वार्डात एकूण ३४३९ मतदार आहेत, त्यापैकी १७१५ पुरुष तर १७९५ महिला आहेत. या वार्डात यात्रा वार्ड, कॉलरी वार्ड, राजीव गांधी वार्ड व कॉलरी येथील मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.
निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष व स्वतंत्र उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. उमेदवार व त्यांची चिन्हे पुढीलप्रमाणे:
१. राहुल पुंडलिक जानवे (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) - 'मशाल' चिन्हावर (बटन क्र. ६)
२. सचिन नागोराव चूटे (भारतीय जनता पक्ष) - 'कमळ' चिन्हावर
३. राजकुमार लक्ष्मण खंडारे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) - 'हात' (पंजा) चिन्हावर
४. गणेश उर्फ प्रज्वल नंदकिशोर जानवे (शिवसेना - एकनाथ शिंदे गट) - 'धनुष्यबाण' चिन्हावर
५. राष्ट्रपाल गायकवाड (वंचित) - 'सिलेंडर' चिन्हावर
६. सुरज पारशिवे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - अजित पवार गट) - 'घडी' चिन्हावर
यापैकी शिवसेना (उद्धव गट)चे उमेदवार राहुल पुंडलिक जानवे यांनी आधी वरोरा नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून (२०१२-२०१४) तसेच दोन वेळा नगरपालिका सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अनेक रुग्ण व अपघातग्रस्तांना मोफत सेवा पुरविली आहे. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी तसेच नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्याचा त्यांचा आढावा आहे. यावर्षी त्यांनी मतदारांना आशीर्वादरूपी भरघोस मतदानाचे आव्हान दिले आहे.
यात्रा वार्डातील बरेच उमेदवार बाहेरील असून जनसंपर्क कमी असल्याचा दावा राहुल जानवे यांनी केला आहे. त्यामुळे मतदारांसोबत राहुल जानवे यांची नाळ जोडल्याचे तेथील नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. सर्वसामान्यांचे दैनंदिन कार्य असो व आर्थिक मदत नेहमी समाज कार्यासाठी तत्परतेने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
निवडणुकीत प्रत्येक उमेदवार व पक्ष आपापल्या चळवळीतून मतदारांना संपर्क साधीत आहेत. यामध्ये राहुल जानवे बाजी मारनार काय हे येणाऱ्या दिवसात कळणार आहे.
प्रभाग सात मधील २० डिसेंबरला मतदान होणार आहे. यामध्ये सर्वच पक्ष आपापली दावेदारी घोषित करित आहे. भाजप पक्षाचे सचिन चूटे यांनी सुद्धा आपली दावेदारी घोषित केली आहे.
---------------------------------------------
Comments
Post a Comment