नागपूर, : नागपूर येथील भारतीय जनता पक्ष (भाजप)च्या कार्यालयात विदर्भ संघटन मंत्री व वरिष्ठ नेते श्री. उपेंद्र कोटेकर यांची चंद्रपूर भाजपा नेते, cdccबँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमात वरोरा विधानसभा संघटक श्री. किशोर बावणे हे सुद्धा विशेष रूपाने उपस्थित होते.
या भेटीदरम्यान वरोरा विधानसभा क्षेत्रातील पक्ष संघटना आणि आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यात आली. याशिवाय, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबतही सखोल व सकारात्मक चर्चा झाली.
या संदर्भात भाजप नेते श्री. किशोर बावणे म्हणाले, "विदर्भातील संघटन शक्ती मजबूत करण्यासाठी आमचे संघटन मंत्री श्री. उपेंद्रजी कोटेकर यांचा मार्गदर्शन लाभत आहे. वरोरा विधानसभेसह संपूर्ण विदर्भात आगामी स्थानिक निकाय निवडणुकीसाठी पक्षाची तयारी जोरात सुरू आहे."
या चर्चेतून पक्षाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील निवडणूक तयारीवर भर देण्यात आला. स्थानिक प्रश्न, मतदारसंघ रचना आणि यशस्वी निवडणूक आघाडीसाठीच्या रणनीतीवरही विचारविनिमय झाला. या बैठकीद्वारे विदर्भ प्रदेशात भाजपची संघटनात्मक तयारी आणखी दृढ होण्याची अपेक्षा आहे.
चंद्रपूर -आर्णी लोकसभा क्षेत्रातील तसेच विदर्भातुन समस्या घेऊन आलेल्या सर्वांच्या विविध समस्याचे निराकारण करण्याकरिता नागपूर येथे आकाशवाणी विश्रामगृहात मा.श्री.हसराजजी भैया अहिर साहेब अध्यक्ष मागासवर्ग आयोग केंद्र सरकार यांच्या उपस्थित बैठक सपन्न.
Comments
Post a Comment