लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-अधिकाऱ्यांच्या संयुक्त छाप्यात वरोर्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त.

 लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-अधिकाऱ्यांच्या संयुक्त छाप्यात वरोर्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त.

 पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे स्वतः संघटक व सहकाऱ्यांनी धाड घातल्यानंतर अन्न व पुरवठा विभागाचीही कारवाई; सहा ठिकाणी माल हस्तगत

वरोरा: शहरात अवैध सुगंधित तंबाखू (गुटखा) विक्रीविरोधात शिवसेनेने सुरू केलेल्या अभियानाला यश मिळत आहे. लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या छाप्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यापूर्वी शिवसेनेच्या तक्रारीनंतरही पोलिस कारवाई न झाल्यामुळे संघटकांनीच पोलिसांच्या साहाय्याने एका गोदामवर छापा टाकून गुटखा पकडून दिला होता.

 वरोरा शहरात अवैध गुटखा विक्रेत्यांची टोळी सक्रिय असून पोलिसांचा त्यांवर ताबा नसल्याचे आरोप करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून पक्षाने या विरोधात निवेदने दिली . त्यानंतर, बुधवारी तीन तारखेला मुकेश जीवतोडे व नितीन मत्ते यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसोबत 'शिवसेना स्टाईल'मध्ये एका गाडीला अडवून गुटखा पकडून दिला व पोलिसांकडे त्याची तक्रार केली. या गाडीचा मागोवा घेऊन एकर्जुना गावात किरायाच्या घरातून मोठा साठा बाहेर काढण्यात आला, तथापि तस्कर अनिल बोधे व त्याचे सहकारी पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

या घटनेनंतरही पोलिसांकडून व्यापक कारवाई झाली नसल्याच्या तक्रारीनंतर, अन्न व पुरवठा विभागाचे अधिकारीही कार्यवाहीत सामील झाले. ३ डिसेंबरच्या रात्री लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे, शिवसेना कार्यकर्ते, सहाय्यक आयुक्त प्रवीण उमक व त्यांच्या टीमने संयुक्त छापे टाकले. या मोहिमेदरम्यान शहरातील सहा ठिकाणी धाडा घालण्यात आले व मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत लाखो रुपये  असल्याचे पोलिस सूत्रांनी नोंदवले. तसेच, गुन्ह्यात वापरली जाणारी एक पिकप गाडीही हस्तगत करण्यात आली. अजूनही विविध ठिकाणी धाडसत्र  करून माल हस्तगत करणे सुरू आहे.

या संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांनी अवैध तंबाखू गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवसेनेच्या या आक्रमक मोहिमेमुळे शहरातील अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाल्याचे सांगितले जाते. संघटक जीवतोडे यांनी आता प्रत्येक गोदामवर कारवाईची मागणी केली असून, पोलिसांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विभागीय अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्याचा मार्ग अवलंबल्याचे दिसते.
............


Comments