स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. उमेदवारांनी माहिती अवश्य वाचावी.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. 

उमेदवारांनी माहिती अवश्य वाचावी. 

वरोरा 
चेतन लूतडे 
संकेतस्थळ: https://mahasecelec.in/

 नगरपरिषद निवडणुका- राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी  उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून (10 नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. 

संभाव्य उमेदवारांना या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करून Online नामनिर्देशन पत्र व शपथ पत्र मध्ये माहिती भरून त्याची प्रिंट घेऊन त्यावर स्वाक्षरी करून ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे विहित वेळेत व विहित पद्धतीने दाखल करणे आवश्यक आहे.
नामनिर्देशन पत्रासह सादर करावयाची शपथपत्रे व कागदपत्रे

1. Online download केलेले साक्षांकित शपथपत्र (शपथपत्र साक्षांकन करण्यास सक्षम प्राधिकारी - प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, Oath Commissioner, नोटरी पब्लिक आणि उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी)

२. राखीव उमेदवारासाठी

१. जात प्रमाणपत्राची सत्यप्रत

२. जात वैधता प्रमाणपत्राची सत्यप्रत अथवा जातीची वैधता तपासणीकरिता जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा

३. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिण्याच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्या बाबतचे हमीपत्र

३. उमेदवार त्याच नगरपालिकेच्या अन्य प्रभागातील मतदार असेल तर मतदार यादीची प्रमाणित प्रत

४. वयाबाबतचा पुरावा - दहावीची सनद (ssc certificate)/ जन्म प्रमाणपत्र

५. अपत्यासंदर्भातील शपथपत्र (लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र stamp paper वरील)

६. महिला उमेदवारांचे नाव बदलले असल्यास-विवाह नोंदणी प्रमाणपत्र/राजपत्र/विवाह नंतरचे नावाचे शपथपत्र

७. शौचालय असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र

८. नवीन / स्वतंत्र बँक खात्याचा तपशील (बैंक पासबुक)

९. अनामत रक्कम भरणा केल्याची पावतीची सत्यप्रत

१०. नादेय प्रमाणपत्र

११. उमेदवार राजकीय पक्षाद्वारे निवडणूक लढवीत असल्यास पक्षातर्फे जोडपत्र १ व २

१२. दोन रंगीत फोटो

१३. इतर असल्यास (आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड)

Comments