कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश गिरटकरची तुतारी वाजणार!


प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश गिरटकरची तुतारी वाजणार!


वरोरा : वरोरा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी २०२५ साठी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बहुजन वंचित आघाडी या महायुतीतर्फे श्री प्रकाशभाऊ गिरटकर सर्वसाधारण गट-ब मधून नगरसेवकपदाचे अधिकृत उमेदवार आहेत.

त्यांच्यासोबतच महिला राखीव गटातून श्रीमती मोनाली संतोष काकडे व नगराध्यक्ष पदासाठी सोनम पंकज नाशिककर  हे उमेदवार आहेत. पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या उत्साही उपस्थितीत उमेदवारांची निवडणूक प्रचार आघाडीवर आहे.
      प्रकाश गिरटकर बांधकाम ठेकेदार, प्रभाग 9

प्रकाश गिरटकर हे ठेकेदार असून ते दीर्घकाळापासून समाजकार्यात सक्रिय सहभागी आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणातील मजदूर वर्गाशी व वरिष्ठ नागरिकांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे. गरजूंची मदत करणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग असल्याने जनसामान्यांशी त्यांची नाळ चांगली जोडलेली असल्याचे स्थानिक नेते सांगतात. या सर्व गुणांच्या आधारेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक ९ साठी उमेदवारी बहाल केली आहे.

प्रभागातील मतदारांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाचा आधार घेऊन, पक्षाकडून मतदारांना विनंती करण्यात आली आहे की, येत्या मंगळवारी दोन डिसेंबर रोजी बटन क्रमांक  3 दाबून  'तुतारी' या बोधचिन्हावर आशीर्वाद रूपी मतदान देऊन प्रकाश गिरटकर यांना बहुमताने विजयी करण्याची विनंती पक्षाने केली आहे.


Comments