कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

प्रभाग १२ 'गट अ' मधील उमेदवार सौ. वृषाली पांढरे व दिपक पारधे यांच्या प्रचारासाठी आमदारांची सभा.


प्रभाग १२ 'गट अ' मधील उमेदवार सौ. वृषाली पांढरे व दिपक पारधे यांच्या प्रचारासाठी आमदारांची सभा.

बातमी:

भद्रावती.भारतीय जनता पार्टी (भाजप)चे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अनिलभाऊ धानोरकर आणि प्रभाग क्र. १२ 'गट अ' मधील उमेदवार सौ. वृषाली पांढरे व दिपक पारधे यांच्या निवडणूकीय प्रचारासाठी पक्षाच्या जनप्रतिनिधींची मोठी ताकद प्रभाग क्रमांक १२ मध्ये एकत्र आली.

या प्रचार बैठकीला भाजपचे आमदार करणजी देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व भद्रावती नगरनिगम निवडणूक प्रमुख रवींद्र शिंदे, संघटक किशोर बावणे, माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, धनराज आस्वले, गोपालराव ठेगणे, अमित गुंडावार, भारतीय युवा मोर्चा शहर अध्यक्ष विशाल ठेगणे, संजय पारखी, सौ. उल्का पदमावार, सौ. अर्चना खंडाळे, सौ. लता भोयर, माजी नगराध्यक्षा सुनीता वरटकर, विश्वास कोंगरे, विशाल पारखी यांसह पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून उमेदवारांना पाठिंबा दर्शविला.

या संयुक्त जनसंपर्काच्या कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. भद्रावती नगरपरिषद निवडणुक २०२५ साठी पक्षाची तयारी दर्शवणारी ही बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.

-----****

Comments