कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

काँग्रेसने वरोरा नगराध्यक्ष पदासाठी अर्चना ठाकरेचा उमेदवारी अर्ज दाखल .


काँग्रेसने वरोरा नगराध्यक्ष पदासाठी अर्चना ठाकरेचा उमेदवारी अर्ज दाखल .

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा : वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सौ. अर्चना आशिष ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.

हा अर्ज दाखल करतेवेळी वरोरा शहरातील नागरिकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दिसलेला उत्साह विजयाची सूचना देत आहे, असे पक्षतर्फे नमूद करण्यात आले.

या महत्त्वाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अहेतेशाम अली, श्री. विलास टिपले, श्री. गजानन मेश्राम, श्री. आशिष ठाकरे यांच्यासह इतर अनेक सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

---**

Comments