कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

वरोरा प्रभाग २ मध्ये मोठी राजकीय घडामोड: भाजपमध्ये झाला सामूहिक प्रवेश, विकासाचा आणि ऐक्याचा पाठपुरावा

वरोरा प्रभाग २ मध्ये मोठी राजकीय घडामोड: भाजपमध्ये झाला सामूहिक प्रवेश, विकासाचा आणि ऐक्याचा पाठपुरावा

वरोरा : वरोरा नगरपरिषद प्रभाग क्र. २ मध्ये आज भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आमदारांच्या उपस्थितीत सामूहिक पक्षप्रवेश केला. या घटनेद्वारे प्रभागात विकासाच्या वाटचालीला नवी उंची मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.
आमदार करण भाऊ देवतळे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर दृढ विश्वास टाकत, तसेच बाळूभाऊ पिसाळ, वैभवजी लोहकरे आणि सौ. वर्षाताई मंगेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खालील व्यक्तींनी भाजपमध्ये विश्वासपूर्वक प्रवेश केला:

· कार्तिक विरुटकर,· सूरज निखाते· भारत लोहकरे
· प्रणय पोद्दार· संदीप येणगंदेवार· नासेन तितरे· अंकुश नाईक· सुयोग धोपटे· सौरभ मोरे· प्रथम हरणे· हर्ष लोहकरे· प्रदीप दुर्गे· आशिष डोंगरे· गणपत मरासकोल्हे· मंगेश निखाडे· मनीष भगत· आदित्य पेंदोर· सुमीत फुलझेले· गोलू येलके· दिनेश ढुमने

यांच्या सामूहिक प्रवेशामुळे प्रभागातील ऐक्य, उमेद आणि विकासाचा दृढ निर्धार अधिक बळकट झाल्याचे मानण्यात येत आहे. भाजपने जाहीर केले की, आगामी निवडणुकीत निर्णायक बदलाची दिशा स्पष्टपणे दिसू लागली आहे. 
...........

Comments