एनसीबीचे अध्यक्ष हंसराज भैय्यांंच्या वाढदिवसानिमित्त वरोरा रुग्णालयात फळवाटप आणि ब्लँकेटवितरण


एनसीबीचे अध्यक्ष हंसराज भैय्यांंच्या वाढदिवसानिमित्त वरोरा रुग्णालयात फळवाटप आणि ब्लँकेटवितरण

वरोरा : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग (एनसीबी), भारत सरकार यांचे अध्यक्ष मा. हंसराजजी भैय्या अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी वरोरा येथील शासकीय रुग्णालयात एक सामाजिक बांधिलकी कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमात रुग्णांना फळवाटप करण्यात आले तसेच हिवाळ्याच्या दिनांक लक्षात घेता गरजूंना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले.
हा सामाजिक उपक्रम आमदार करण देवतळे यांच्या हस्ते पार पडला. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा, महिला आघाडी तसेच सर्व आघाडी या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्य आयोजित करण्यात आले होते.

मा. हंसराज भैय्यांंच्या 'सेवा हीच साधना' या कार्यतत्त्वाचे अनुसरण करून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऊर्जा देणारे फळे व हिवाळ्यात उबदारपणा देणारी ब्लँकेट्स दिली गेली.

या कार्यक्रमात भाजपचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा मोर्च्याचे कार्यकर्ते तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम सेवाभावनेतून आणि उत्साहात पार पडला.

या प्रसंगी उपस्थित आमदार करण देवतळे यांनी  म्हटले, "सेवा, संवेदना आणि समर्पण — याच भावनेतून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा आमचा संकल्प आहे."
.....

Comments