*चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक रोहीत बोम्मावार शेकडो कार्यकर्त्यासह भाजपवासी**महसूल मंत्री बावणकुळे यांच्या उपस्थीतीत मेगा पक्ष प्रवेश**भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळावा आयोजन*
*महसूल मंत्री बावणकुळे यांच्या उपस्थीतीत मेगा पक्ष प्रवेश*
*भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळावा आयोजन*
देशाचे शिर्ष नेतृत्व लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेन्द्र मोदीजी यांच्या कार्यास प्रभावीत होवून तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यात सावली येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चे संचालक श्री रोहीत बोम्मावार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून भाजप परिवाराचा भाग झाले.
या कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार मा. अशोकजी नेते, आमदार मा. किर्तीकुमार भागडिया, आमदार मा. मिलींदजी नरोडे, माजी आमदार मा. सुधाकरजी कोहळे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेडी, ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू डोंगे, माजी नगराध्यक्ष तथा शहर अध्यक्ष सुनिल नामोजवार, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर तसेच भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment