*अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यावर LCB ची कारवाई.*

*अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यावर LCB ची कारवाई.*
*चंद्रपूर:-*
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रोव्हीशन,जुगार रेड तसेच अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर 27 आक्टोंबर रोजी उपविभाग पथक व स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पथक,हे पोलीस पथक पेट्रोलींगवर असतांना गुप्त माहिती मिळाली की,मुल मार्गे चंद्रपूर येथे एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून अंमली पदार्थ(Mephedrone Drug)ची वाहतूक होत आहे.सदर माहितीवरून फॉरेस्ट अकादमी मुल रोड चंद्रपूर येथे नाकाबंदी करून सदर कारला थांबवून पाहणी केली असता 160 ग्राम MD(मेफोड़ॉन)ड्रग्स पावडर मिळून आला.
          यावरून कार चालक दिपक कृष्ण वर्मा वयवर्ष 28 रा. संजयनगर मुल रोड चंद्रपूर,आशिष प्रकाश वाळके वयवर्ष 30 रा.मित्रनगर चंद्रपूर,यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील MD ड्रग्स,पांढऱ्या रंगाची डिझायर कार क्रं.MH/49/AS/ 2704,असा एकूण 16 लाख,12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध रामनगर पोलीस स्टेशन,येथे  संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व,यांच्या नेतृत्वात सपोनि.दिपक कांक्रेडवार,पोउपनि.सर्वेश बेलसरे,पोउपनि. सुनिल गौरकार,पोहवा.सुभाष गोहोकार,पोहवा.सतिश अवथरे,पोहवा.रजनिकांत पुट्ठावार,पोहवा.दिपक डोंगरे, पोहवा.इम्रान खान,पोअं.किशोर वाकाटे,पोशि.शशांक बदामवार,पोशि.हिरालाल गुप्ता,पोशि.अजित शेंडे,सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली आहे.

Comments