चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय : शेतकरी सभासदांसाठी व्याज सवलत योजना सुरू

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय : शेतकरी सभासदांसाठी व्याज सवलत योजना सुरू

चेतन लूतडे 

चंद्रपूर - जिल्ह्यातील पीककर्जदार शेतकरी सभासदांसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९४ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत ऐतिहासिक व्याज सवलत योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी संस्था स्तरावर थकीत असलेले पीक कर्ज व रुपांतर कर्जदार सभासद पात्र राहतील.

योजनेनुसार, संस्थेने आकारलेल्या मुख्य व्याजातून उचल तारखेपासून ७% दराने आकारलेले व्याज वजा करुन उर्वरित रक्कम व्याज सवलतीसाठी दिली जाईल. सभासदांना कर्जाची उचल तारखेपासून वसुली भरणा करण्यापर्यंत ७% दराने आकारलेले व्याज आणि मुद्दल रक्कमेचा एकमुस्त भरणा करावा लागणार आहे.

विशेष म्हणजे, मरण पावलेल्या कर्जदार सभासदांसाठी त्यांच्या वारसदारांनी संपूर्ण मूलधन आणि मरणाआधीच्या दिवशीपर्यंतचे व्याज भरल्यास, मरणाच्या दिवशीपासून आकारलेले संपूर्ण व्याज माफ करण्यात येईल.
ही योजना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार असून, योजनेच्या अटी व शर्थी बँकेच्या धोरणानुसार असतील. अध्यक्ष मा.श्री. रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष मा.श्री. संजय डोंगरे व श्री राजेश्वर कल्याणकर संचालक मंडळ यांनी ही योजना अमलात आणली आहे.
प्रमुख कार्यालय : सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर-४४२४०१
कृषी क्षेत्रात आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठे लाभदायक पाऊल ठरणार आहे.
*********

Comments