नागपूर - नागपूर विभागातील पदवीधर मतदारांसाठी नाव नोंदणीसाठी विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. 'आपण पदवीधर आहात का? आपली नावनोंदणी झाली आहे का?' या प्रश्नांना उत्तर नसल्यास तात्काळ नावनोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे.
नवीन नोंदणी करिता 1 नोव्हेंबर 2022 पूर्वीचे पदवीधर असने आवश्यक आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश असून, अर्जदारांनी फॉर्म १८, पदवी प्रमाणपत्र, आधार किंवा ओळखपत्र घेऊन अर्ज करावा लागणार आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी योग्य मतदार यादी तयार करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. नागरी किंवा इतर कोणतीही ओळख पटवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
नोंदणीसाठी ६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालय, सुयोग हॉस्पिटलजवळ, मेन रोड वरोरा येथे सुविधा उपलब्ध आहे.
हे अभियान करण संजय देवतळे यांच्या पुढाकाराने राबवले जात आहे.
Comments
Post a Comment