आनंदवनात डॉ. विकास आमटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदवनात डॉ. विकास आमटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदवन, वरोरा : महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकासजी बाबा आमटे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदवन येथे गेल्या काही दिवसांतर्गत कार्यक्रम आणि भेटीगाठीचा सोहळा पार पडला. या प्रसंगी त्यांना विविध व्यक्ती आणि संस्थांकडून भेटी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

भेट म्हणून पद्मविभूषण बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांचे पूर्णाकृती कटआऊट, बाबा आमटे यांचे पोर्ट्रेट तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 'ग्रामगीता' ग्रंथ अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमात रवींद्र शिंदे चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज अस्वले, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जयंतभाऊ टेंभुर्डे, भाजप शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुनीलभाऊ नामजोवार, बाजार समिती सभापती राजूभाऊ डोंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, तसेच राजीवजी मिश्रा, विश्वस्त कडू सर, राजेश ताजणे, संजय उंबरे या सर्व मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

या निमित्ताने आनंदवनातील सेवाभावी कार्याचा आढावा घेण्यात आला. सहभागींनी समाजसेवेच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्पही व्यक्त केला.


सरन्यायाधीश श्री. भूषण गवई आणि मातोश्री डॉ. कमलताई गवई यांची आनंदवनात भेट

आनंदवन : भारताचे सरन्यायाधीश मा. श्री भूषणजी गवई यांनी आज सकाळी त्यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई यांच्या सोबत  सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे  यांनी आनंदवन येथे भेट दिली.

या भेटीदरम्यान सहभोजनाच्या कार्यक्रमात डॉ. कमलताई गवई यांच्या पंक्तीत आनंदवनचे विश्वस्त श्री कडू करसर, श्री लोमटे सर, कन्या पल्लवीताई आमटे, अमरावतीतील डॉ. गोविंदजी कासट, आनंदवन वरोराचे विश्वस्त श्री सदाशिवजी ताजणे आणि राजेशजी ताजणे हे सहभागी होते.

ही भेट आनंदवनच्या समाजसेवेच्या कार्याशी ओळख आणि सहकार्याचा एक भाग म्हणून ठरली. सर्वांनी मैत्रीपूर्ण वातावरणात एकत्र वेळ घालवला.

--------------------****------------

Comments