कफ सिरपच्या दुष्परिणामांमुळं गंभीर अवस्थेत असलेल्या मध्ये प्रदेशातील जवळपास 11 चिमुकल्यांना उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होते.
यापैकी 7 रुग्णांचा जवळपास उपचारानंतर मृत्यू झाला, तर 4 जणांची अवस्था गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या 4 पैकी 2 मुलं व्हेंटिलेटरवर आहेत, तर दोघांचे डायलिसिस सुरू आहे. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितलं.
याशिवाय मध्य प्रदेशातील काही मुलांना नागपूरच्याच एम्स आणि खासगी रुग्णलयातही दाखल करण्यात आलं होतं, अशीही माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मृतांपैकी एका 18 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू सोमवारी रात्री उशिरा झाला आहे.
मध्य प्रदेशातील ड्रग कंट्रोल विभागानं शनिवारी (4 ऑक्टोबर) सकाळी तामिळनाडूत बनणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी आणली होती. त्यानंतर सरकारी डॉक्टर प्रवीण सोनी, कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचे संचालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
त्यानंतर तामिळनाडूच्या ड्रग कंट्रोल विभागानं चौकसीत श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीत बनणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये 'भेसळ' असल्याला दुजोरा दिला होता.
यासंदर्भात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वरून माहिती दिली होती.
कोल्ड्रिफ सिरपमुळे आतापर्यंत 24 बालकांचा मृत्यू, झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.देशभरात खळबळ उडाली असून अनेक राज्यांत अलर्ट जारी केला आहे.
सोर्बिटॉल महाग असतो, म्हणून औषध कंपन्या त्याच्या ऐवजी स्वस्त पर्याय म्हणून डायथिलीन ग्लायकॉलचा वापर करतात. हे दोन्ही घटक देशी दारूमध्ये असलेल्या मिथाइल अल्कोहोलच्या श्रेणीत येतात आणि दोन्ही रसायने शरीरासाठी अतिशय घातक असतात."
*************
Comments
Post a Comment