सिताराम पेठ.
सीताराम पेठ - केशव मडावी यांच्या गाईवर आज दिनांक २० ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारच्या सुमारास ३:०० वाजता वाघाने हल्ला केला व गाय ठार केली. ही घटना सीताराम पेठ मधील बोटिंग एरिया येथील बीट क्रमांक ९५६ मध्ये घडली. हल्ला करणाऱ्या वाघाचे नाव ‘भीमा’ असे नोंदवले आहे. स्थानिक लोक व वनखात्याच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
भीमा या वाघाचे वास्तव्य सिताराम पेठ गावामध्ये असून आजूबाजूच्या जंगलातच या वाघाचा नेहमी वावर असतो. त्यामुळे पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी जमा होतात. गावातील नागरिकांना याचा धोका असून वन विभागामार्फत लवकरात लवकर या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment