आय लव यू, ते आय हेट यू... ची संपूर्ण स्टोरी. फेसबुक ची मैत्री पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये.रेकॉरडिंग व मॅसेज तुझ्या नव-याला दाखविल अशी धमकी देत शारीरिक सुख घेतल्याचा आरोप.
रेकॉरडिंग व मॅसेज तुझ्या नव-याला दाखविल अशी धमकी देत शारीरिक सुख घेतल्याचा आरोप.
वरोरा 11/oct/2025
जाहिरात
मोबाईल खरेदी करण्याचे सगळ्यात स्वस्त ठिकाण
वरोरा तालुक्यातील एका गावात विनयभंग केल्याची घटना घडली असून. गावामध्ये 23 वर्षीय शेतमजुरीचे काम करीत असणाऱ्या युवती सोबत फेसबुकवर ओळखी करून युवकाने विनभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
पंचवीस वर्षीय युवा नेता म्हणून ओळख असलेला युवकाने मार्च 2025 मध्ये विवाहित महिलेसमोर प्रेमाचे जाळे टाकले. युवती विवाहित असल्याने फोनचा वापर न करता फेसबुक मेसेजचा सहारा घेण्यात आला. काही दिवसातच आय लव यु चा मेसेज युवतीच्या फोनमध्ये आला. त्यावर विवाहित महिलेने आय हेट यू चा मेसेज पाठवला. हे सर्व नवऱ्याला कळेल अशी भीती असल्याने मोबाईलचा वापर बंद करण्यात आला.
पाच महिन्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये रक्षाबंधन झाल्यानंतर युवती शेतीच्या कामावर गेली. तेव्हा युवकाच्या आईने युवतीच्या मोबाईल वरून मुलाला फोन केला. त्यामुळे हा नंबर युवकाने जतन करून ठेवला. यानंतर युवक वारंवार युवतीला फोन करायचा परंतु ट्रू कॉलर वर अभिजीत कुडे नाव येत असल्याने युवतीला फोन कोणाचा आहे माहित असल्याने फोन जाणून नाकारण्यात आले. परंतु सतत फोन करत असल्याने शेवटी त्रासून युतीने फोन उचलला. व आपण मित्र म्हणून बोलू असे सांगत युवकांनी मित्रत्व केले. त्या दिवसापासून मित्र म्हणून दोघेही बोलू लागले. पती घरी नसल्यावर युवक युवतीला बाहेर बोलवायचा. एके दिवशी रात्री युवतीला घराबाहेर बोलवून तू मला खूप आवडतेस ,आपण कुठेतरी बाहेर भेटू अशी आराधना युवतीकडे करण्यात आली. परंतु तीने नाकारली असल्याचे सांगितले.
जाहिरात
दिनांक 11 सप्टेंबर 2025 ला युवतीच्या पतीसोबत दवाखान्यामध्ये जात असताना पाहून युवक नंतर मागे आला. व फोन करून युवतीला बोलावले. तेव्हा त्याला नाही म्हणून सांगितले.
त्यावर त्याने युवतीला, माझ्या जवळ तुझे असलेले रेकॉरडिंग व मॅसेज तुझ्या नव-याला दाखविल अशी धमकी दिली. त्यामुळे नाईलाजास्तव युवतीने त्याला भेटण्यास होकार दिल्याचे युवतीने सांगितले. अंदाजे 01/00 वा. चे दरम्यान युवक हा हिंगणघाट येथे आला. त्याने युवतीला आपल्या बाईक वर बसवुन हिंगनघाट येथिल लॉजवर (नाव आठवत नाही) नेले. आणी युवती नाही म्हणत असताना देखील त्याने युवती सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. व पुन्हा दुपारी दरम्यान पुन्हा दवाखाना हिंगणघाट येथे आणून सोडले. नाही म्हणत असतांना देखील त्याने युवती सोबत जबरदस्तीने शारिरीक संबध केले. व पुन्हा त्याने युवतीला दुपारी 03/00वा. दवाखाना हिंगणघाट येथे सोडले.
हा सगळा प्रकार पतीच्या लक्षात आल्याने फोन चेक करण्यात आला. यानंतर युवतीने आप बिती सांगितली.
पतीने भांडण केले. यानंतर हे प्रकरण पोलिसात दाखल करण्यात आले.
अशाप्रकारे वेगवेगळ्या दिवशी युवतीला बोलावून विनयभंग करण्याचा प्रयत्न युवकाने केल्याचा आरोप युवतीने वरोरा पोलीस स्टेशन येथे केला आहे.
या आधारे वरोरा पोलिसांनी अधिनियम भारतीय न्याय सहित 2023 प्रमाणे 74, 64(2)m, 351(2) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. व पुढील तपास सुरू आहे.
युवकाचे मत
राजकीय क्षेत्रात मोठे प्राबल्य असल्याने माझी प्रतिमा खराब करण्याच्या दृष्टिकोनातून हा डाव रचला असल्याचे मत युवकाने व्यक्त केले. मी फोन केलेले नाहीत.
**********""************
जाहिरात
Comments
Post a Comment