वरोरा
चेतन लूतडे
आनंदवन, दि. ११ – आनंदवन येथील मुक बधिर विद्यालयात आज श्रीमती मायाताई मोरेश्वर टेमुर्डे (आईसाहेब) यांचा ८० वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सन्मानाने संपन्न झाला. या समारंभात मुक बधिर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुमधुर स्वरानंदन ऑर्केस्ट्राने सर्वच उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या निमित्ताने विद्यार्थ्यांसोबत सहभोजनाचा अनुभव घेण्यात आला. स्वरानंदन ऑर्केस्ट्रा हॉलमध्येच केक कापून आईसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.
या विशेष प्रसंगी माजी आमदार एड. श्री. वामनराव चटप, सौ. पल्लवीताई आमटे, श्री. रमेश राजुरकर, डॉ. सौ. प्रतिभा जीवतोडे, श्री. सुधाकर कडू, श्री. सदाशिव ताजने, श्री. रवींद्र शिंदे, श्री. धनराज आस्वले, श्री. जयंत टेमुर्डे, श्री. अमन टेमुर्डे, राजेश ताजने, सौ. मायाताई राजूरकर, राहुल पावडे, अभिजीत बोधले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment