चिमूर :
चिमूर येथील शेतकरी भवन येथे चंद्रपूर जिल्हा सहकारी संस्था सचिव संघटनेतर्फे मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात चिमूर विधानसभा आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. रवींद्रजी शिंदे तसेच जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष मा. संजयजी डोंगरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. रवींद्रजी शिंदे होते, तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष मा. संजयजी डोंगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था गटसचिव कर्मचारी संघटना अध्यक्ष श्री भगीरथ माकडे, चंद्रपूर जिल्हा सहकारी संस्था सचिव संघटनेचे अध्यक्ष श्री हेमंत लोडे, उपाध्यक्ष श्री मंगेश मस्के, सचिव श्री प्रभाकर हनवते, प्रसिद्धी प्रमुख श्री पंकज रणदिवे तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री आवेशभाऊ पठाण, श्री गणेशभाऊ तर्वेकर, श्री संजयजी गजपूरे (नागभीड), श्री राजूमामा मिश्रा, श्री मनिषभाऊ तुम्पल्लीवार, कृउबास संचालक श्री घनश्यामजी डुकरे, श्री प्रकाशजी वाकडे, श्री ओमप्रकाश गणेरकर व श्री प्रकाशजी चिडे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी आमदार भांगडीया यांनी सहकार क्षेत्रातील सचिवांची भूमिका अधोरेखित करत संघटनात्मक ऐक्याचे महत्त्व सांगितले, तर मा. रवींद्र शिंदे यांनी जिल्हा बँकेमार्फत सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. उपाध्यक्ष संजय डोंगरे यांनीही सचिव संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
Comments
Post a Comment