वरोरा
वरोरा, दिनांक ५ ऑक्टोबर, २०२५ – वरोरा येथील मामा तलावामध्ये शनिवारी एका अनोळखी पुरुषाचे प्रेत पाण्यात तरंगत असलेलं आढळल्याने प्रशासनात हाहाकार माजला आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने हे प्रेत तलावातून बाहेर काढण्यात आलं असून, पोलिसांनी या घटनेशी संबंधित शोधपत्रिका जारी केली आहे.
मृतकाची तात्पुरती ओळख सांगताना पोलिसांनी नमूद केलं आहे की, सदर व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वर्षांचा पुरुष आहे. त्याची उंची सुमारे ५ फुट ४ इंच आहे आणि डोक्यावरील केस अर्धवट गळलेले आहेत. पाण्यात दीर्घ काळ असल्यामुळे चेहरा, डोळे आणि डाव्या बाजूचा कान पाण्यातील जीवजंतूंनी खाल्लेला दिसत आहे.
मृतकाच्या शरीरावरील ओळखणीची खूणा
मृतकाच्या शरीरावर काही विशेष खुणा आहेत, ज्यांच्या आधारे त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न चालू आहे:
· उजव्या हातावर 'S' हे अक्षर गोंदवलेले आहे.
· अंगावर डार्क हिरवा शर्ट आणि काळा फुलपॅन्ट होता.
· कमरेला गुलाबी रंगाचा बेल्ट आणि लाल रंगाचा कडदुडा बांधलेला होता.
· उजव्या हातात लाल, गुलाबी आणि हिरव्या रंगाचा धागा होता.
· अंतःवस्त्र 'शिवम' कंपनीचे, नंबर ८५ चे आणि निळ्या रंगाचे होते.
या घटनेची नोंद वरोरा पोलीस स्टेशनतर्फे K 112/25 कलम १७४ BNSS खाली करण्यात आली आहे. तपास दुरस्तीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना बिनतारी संदेशाद्वारे या मृतकाची माहिती पाठवण्यात आली आहे . घटनेची चौकशी सुरू असून, मृतकाच्या कुटुंबियांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना यासंबंधी कोणतीही माहिती असल्यास, ती वरोरा पोलीस स्टेशनला कळवण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
Comments
Post a Comment