नागपूर, १४ ऑक्टोबर 2025: वरोरा-भद्रावतीचे आमदार करणभाऊ देवतळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण विदर्भातील एक चांगले नाव म्हणून ओळखले जाणारे डॉ. विजय देवतळे, डॉ. आसावरीताई देवतळे, कन्हैयाजी जयस्वाल यांसह तीसहून अधिक मान्यवरांनी दि. १३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला .
या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते . या प्रसंगी त्यांनी नव्याने पक्षात सामील झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
स्थानिक पातळीवर भाजपची मजबुती
हा मोठा पक्षप्रवेश स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी मजबूत करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. अलीकडेच, भाजपने राज्यातील ५८ जिल्हा आणि शहर अध्यक्षांची नियुक्ती करून स्थानिक स्तरावर संघटना बळकट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे . या पार्श्वभूमीवर, वरोरा-भद्रावती मतदारसंघातून अशा प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश पक्षाला स्थानिक पातळीवर मोठी बळकटी देणारा ठरू शकतो.
नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींमध्ये भाजपची भूमिका लक्षणीय राहणार असल्याने, या पक्षप्रवेशामुळे पक्षाची स्थानिक उपस्थिती आणि प्रभाव वाढेल असे अनुमान आहे .
यातील काही प्रमुख नावे
नव्यानेपक्षात सामील झालेल्या व्यक्तींमध्ये डॉ. विजय देवतळे, डॉ. आसावरीताई देवतळे, कन्हैयाजी जयस्वाल, राजुपटील देवतळे, ज्योतीताई जयस्वाल, गुणवंत भोयर, अॅड. जयंत ठाकरे, लोकेश पांढरे, राजू झापेडे, सोमदेव कोहाड, सुधाकर आत्राम, अजय ठाकरे, विठ्ठल टाले, मंदा तराळे, नरेंद्र भोयर, रवी डवरे, शंभू वरघणे, डॉ. राजेंद्र ढवस, राजूपटील लडके, राहुल ठेंगणे, शरद यादव, डॉ. रतन बाला, इकबाल शेख, हयानी शेख, स्वाती भोयर, विनोद लांबट, बंडू डोंगरे, माया डोंगरे व जयश्री ठाकरे यांचा समावेश आहे .
Comments
Post a Comment