चंद्रपूर, (तारीख): चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल, घुग्घुस, गडचंदूर, चिमूर, राजूरा, नागभीड या नगरपरिषदा आणि भिसी नगरपंचायत येथील महिला (अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय व सर्वसाधारण) आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठीचे आरक्षण सोडतीपद्धतीने निश्चित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले असताना, राज्यभरातील 247 नगरपालिका, 147 नगरपंचायतच्या नगराध्यक्षाचे आरक्षण सोडत जाहीर झाले.नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
राज्यातील यापैकी 67 नगरपालिकेचे नगराध्यक्ष ओबीसी साठी जाहीर झाले आहे. यापैकी 34 जागा महिला ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
या मतदानामुळे महिलांना नेतृत्वाची मोठी संधी मिळणार असून, अनेक ठिकाणी सर्वसामान्य महिलांनाही पंचायत राज व्यवस्थेत प्रवेश करण्याची संधी मिळेल.
६७ नगरपरिषद पैंकी ३४ ओबीसी महिलांसाठी
आरक्षित राज्यभरातील नगरपरिषद निवडणुकीसाठी ओबीसी महिलांसाठी ६७ पैकी ३४ नगरपरिषदांचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे. या यादीमध्ये भगूर, इगतपुरी, विटा, बळ्हारपूर, धाराशीव, भोकरदन, जुनर, उमरेड, दौंड, कुर्लगाव बदलापुर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजीरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर- नवाबपूर, औसा, करजत, देगलूर, चोपडा, सटाणा, दौंडईचा वरवडे, बाळापूर, रोहा, कुरडुवाडी, धामणगावरेल्वे, वरोरा या नगरपरिषदांचा समावेश आहे.
वरोरा नगरपालिका येथील प्रभागानुसार आरक्षण सोडत.
Comments
Post a Comment