खेमजई येथे मनरेगा महासंचालकाची भेट

खेमजई येथे मनरेगा महासंचालकाची भेट

वरोरा : 
'मग्रारोहयो' अंतर्गत ऍक्सिस बँक फाउंडेशन, भारत रूरल लाइव्हलिहूड्स फाउंडेशन व मनरेगा यांच्या सहकार्याने वरोरा तालुक्यात खेमजई येथे मनरेगा महासंचालक नंदकुमार वर्मा यांची भेट देऊन मार्गदर्शन केले.
कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील एकूण 47 गावामध्ये "महाराष्ट्र - अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प" सुरु आहे.
अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणी व ग्रामसंभाच्या अडचणीबाबत चर्चा करण्याकरीता मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार वर्मा, मनरेगाचे राज्य प्रशिक्षण समन्वयक  निलेश घुगे , राज्य गुणवत्ता नियंत्रक राजेंद्र शहाडे यांनी वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत खेमजई येथे भेट दिली.सर्व पाहुण्यांचे स्वागत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेमजई कडून लेझीम द्वारे करण्यात आले. 

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) चंद्रपूर  शुभम दांडेकर ,गट विकास अधिकारी चंद्रपूर (नरेगा) लक्ष्मी कुमरे, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रपूर महेश वट्टी , वरोरा तहसीलदार योगेश कौटकर,गट विकास अधिकारी वरोरा गजानन मुंडकर, कार्यक्रम व्यवस्थापक महाराष्ट्र (बीआरएलएफ) मानस मंडल, तसेच इतर शासकीय विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच मनीषा चौधरी, उपसरपंच चंद्रहास मोरे,डॉ. प्रमोद गंपावार,(बीआरएलएफ) टिम लीडर विक्रांत देहणकर, उपजीविका तज्ञ चेतना लाटकर,बीआरलफएफ जिल्हा समन्वयक  सतीश माकोडे, व कृषी विकास संचालक सत्यम पलसपगार, मुख्यध्यापिका चेतना मुन, ईश्वर टापरे,प्रकल्प समन्वयक अमोल काळे व कृषी विकास वरोरा प्रकल्प टीम, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान नागरीकांनी त्यांच्या समस्या मांडून त्या सोडविण्याची मांगणी केली. 
काय आहे प्रकल्पाचा उद्देश ?
ग्रामपंचायतींचे बळकटीकरण करणे व उपजिविकेवर अवलंबुन असलेल्या कुटुंबाला मनरेगाच्या साहाय्याने सुविधा संपन्न बनवणे आणि त्यांच्याकरिता शाश्वत साधन उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
भेटीदरम्यान प्रकल्पातील विविध घटकांचे बारकाईने निरीक्षण करून गावकऱ्यांशी उपजीविका वाढविण्या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली  व त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.यादरम्यान खेमजई येथील हरिदास चौधरी यांच्या मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या नेपीअर गवत प्रकल्प भेट देण्यात आली.खेमजई व परिसरातील लोकांनी मनरेगा येणाऱ्या अडचणी बाबत प्रश्न विचारून चर्चा केली.वरोरा तालुक्यातील रोजगार सेवक संघटना यांनी चर्चा करून आपल्या मागण्याचे निवेदन नंदकुमार वर्मा यांना दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था येथील सर्व टीम व जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत खेमजई यांनी सहकार्य केले.

Comments